हर्सूल कारागृहातील कोरोनाबधित कैदी पोलिसां समक्ष पळाले.

Foto
औरंगाबाद दि.8 (सांजवार्ता ब्युरो) : हर्सूल कारागृहातील कैदाना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना किलेंअर्क येथील कोविड सेंटर मध्ये ठेवण्यात आले होते.मात्र रविवारी रात्री खिडकीचे गज तोडून दोन कैदी पोलिसासमक्षच पळाले अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे.अक्रम खान गयास खान वय-27 (रा.सलमान टी,जटवाडा) सय्यद सैफ सय्यद असद वय-24(रा.नेहरूनगर, कटकटगेट) अशी पलायन केलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत.
कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हर्सूल मधील 29 कैदाना केलेअर्क येथील कोविड सेंटर येथे उपचारासाठी ठेवण्यात आले होते.इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेली सी-8 क्रमांकाच्या वॉर्डामध्ये अक्रम आणि सैफ या दोघांवर उपचार सुरू असताना रविवारी रात्री 10.45 वाजता हत्येच्या गुन्ह्यातील कोठडीत असलेला अक्रमखान व फसवणुकीच्या गुन्ह्यातील सय्यद सैफ या दोघांनी इमारतीच्या पाठीमागील खिडकीचे गज वाकून त्यांना वापरासाठी दिले गेलेली बेडशीटच्या गाठ बांधून खिडकीतून खाली उतरले आणि कोविड सेंटरच्या पाठीमागील जुन्या एनसीसी गार्ड असलेल्या भागातून पलायन केले. दरम्यान ही बाब कर्तव्यावर असलेल्या तुरुंग अधिकारी कैलास अंकुश काळे वय-27 (नेमणूक हर्सूल कारागृह ) यांना कळाली असता त्यांनी त्यांच्या दुचाकीने सह कर्मचारी भांबरे यांना घेऊन दोघांचा शोध घेतला असता.दोघेही दिल्लीगेट येथे लपून बसल्याचे काळे यांना दिसले. त्यांनी दुरूनच त्यांना आत्मसमर्पण करण्याची विनंती केली मात्र दोन्ही आरोपीनी अंधारात गल्ली-बोळातून पळ काढत पसार झाले. काळे यांनी घटनेची माहिती हर्सूल कारागृह अधीक्षकांना दिली व या प्रकरणी काळे यांच्या फिर्यादीवरून दोन्ही फरार आरोपी विरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात करण्यात आला आहे. बेगमपुरा पोलिसांसह गुन्हेशाखेचे पथक दोघांचा शोध घेत आहेत.